अंनिसतर्फे ‘निर्भय वॉक’

अंनिसतर्फे ‘निर्भय वॉक’

पुणे, २० ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज १० वर्षे पूर्ण झाली. तरीही अजून त्यांच्या हत्येचा गुन्हेगार सापडला नाही. याच्याच निषेधार्थ रविवारी (दि. २० ऑगस्ट २०२३) पुणे शहरात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मूक मोर्चा काढला. सरकारने या विरोधात कारवाई करण्याचे आश्वासन देऊनही मुख्य सूत्रधार कुठे आहेत, हे अजून कुणालाही ठाऊक नाही.

नरेंद्र दाभोलकरांच्या हत्या करणाऱ्याला अटक व्हावी, यासाठी दरवर्षी अंनिस शांततेच्या मार्गाने नवनवे आंदोलन करत असते. या वर्षीदेखील ओंकारेश्वर ते एस. एम. जोशी हॉलपर्यंत मूक मोर्चा काढून निषेध करण्यात आला. या मोर्चामध्ये शहरातील अनेक मान्यवर सहभागी झाले होते. मोठ्या संख्येने महिला आणि तरुणी यावेळी उपस्थित होत्या.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version