‘ओखी’ वादळात 9 जणांचा मृत्यू, 22 मच्छीमार बेपत्ता

‘ओखी’ वादळात 9 जणांचा मृत्यू, 22 मच्छीमार बेपत्ता

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

तमिळनाडूच्या किनारपट्टीला ‘ओखी’ वादळानं तडाखा दिलाय. यात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झालाय तर 22 मच्छीमार बेपत्ता झाल्याचं वृत्त आहे.

या वादळाचा तडाखा कन्याकुमारी, तिरुनेलवेली आणि तुनीकोरन या जिल्ह्यांना बसलाय. या सर्वच भागात सोसाट्याचा वारा आणि मूसळधार पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालय. मोठमोठी झाडं उन्मळून पडली असून विद्युत खांबही आडवे झाल्यानं अनेक भागात विद्युत पुरवठा खंडीत झालाय.

खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आलीये तर अनेक रेल्वेही रद्द करण्यात आलेल्या आहेत. आणीबाणीच्या परिस्थितीसाठी NDRF च्या 47 तुकड्या तैनात करण्यात आल्यात. येत्या 24 तासात वादळाचा वेग वाढून मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

बांगलादेशनं या वादळाला ‘ओखी’ नाव दिलय

सरकार तर्फे 16 पुनर्वसन केंद्र तयार

पुनर्वसन केंद्रात 1044 लोकांना आश्रय

नौदल, वायूदल, कोस्ट गार्ड्सचं सर्च ऑपरेशन सुरू

‘ओखी’ शनिवारी लक्षद्वीपमध्ये धडकणार असल्याची माहिती

नौदलाच्या 5 शिप रवाना

कोच्चीहून नेव्हीच्या 5 शिप रेस्क्यूसाठी रवाना

कन्याकुमारी, तूतिकोरिन आणि रामनाथपुरमसह राज्याच्या इतर किनारी भागांत

24 तासांसाठी मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा ईशारा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version