सलाम! शहीद निनाद यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

सलाम! शहीद निनाद यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

जम्मू- काश्मीरच्या बडगाम येथे हवाई दलाचे हेलिकॉप्टर दुर्घटनेत वैमानिक निनाद मांडवगणे शहीद झाले. निनाद हे नाशिकचे असून त्यांचे पार्थिव नाशिकमध्ये दाखल झाले आहे. तसेच शहीद निनाद यांच्या पार्थिवावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. शहीद निनाद हे २२ वर्षाचे होते.

कोण होते निनाद मांडवगणे ?

निनाद अनिल मांडवगणे भारतीय वायूसेनेत वैमानिक होते.

निनाद हे मुळ नाशिकचे रहिवासी आहेत.

निनाद यांचे माता-पिता बॅँकेतून सेवानिवृत्त आहेत.

पुणे महामार्गावरील रवीशंकर मार्गालगत बॅँक आॅफ इंडिया कॉलनीत ते राहतात.

त्यांच्या पश्चात पत्नी विजेता, दोन वर्षांची मुलगी, आई वडील आणि धाकटा भाऊ असे कुटुंब आहे.

निनाद यांचे पार्थिव वायूसेनेच्या विमानातून रात्री 10 वाजेच्या सुमारास ओझर विमानतळावर आणण्यात आले.

यावेळी भारतीय सैन्याकडून त्यांना मानवंदना देण्यात आली.

आज त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version