Virar News : डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् नवजात बाळ तीन फुटांवरून खाली पडलं; रुग्णालयाच्या हलगर्जीपणावर कुटुंबियांचा संताप

Virar News : डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् नवजात बाळ तीन फुटांवरून खाली पडलं; रुग्णालयाच्या हलगर्जीपणावर कुटुंबियांचा संताप

विरार : विरार पश्चिमेकडील डॉ. जोगळेकर रुग्णालयात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. प्रसूतीच्या वेदना होत असताना रुग्णालयाच्या दुर्लक्षामुळे एका 7 महिन्यांच्या गर्भवती महिलेचे नवजात बालक प्रसूतीदरम्यान थेट जमिनीवर पडले. या अपघातात नवजात बाळाला गंभीर जखमी झाली असून त्याच्यावर सध्या ठाणे येथील एनआयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित सात महिन्यांची गर्भवती महिला बुधवारी तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्याने विरार पश्चिमेतील डॉ. जोगळेकर रुग्णालयात दाखल झाली होती. प्रसूतीची वेळ जवळ आल्याने तिने वारंवार तेथील डॉक्टर आणि परिचारिकांना “पोटातून बाळ बाहेर येत असल्याची जाणीव होत आहे,” असे सांगितले. मात्र, रुग्णालय प्रशासनाने आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तिच्या या गंभीर तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्यामुळे महिला उभी असतानाच तिच्या गर्भाशयातून नवजात बालक थेट अडीच ते तीन फूट उंचीवरून कडक जमिनीवर कोसळले. 

हेही वाचा : Bhiwandi Building Collapses : इमारतीचा ‘धोकादायक’ यादीत समावेश, तरीही नागरिकांचे वास्तव्य, मृतांचा आकडा 9 वर; ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version