केतन अग्रवाल प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. केतन अग्रवाल हत्याकांडाने अख्ख्या महाराष्ट्राला हादरवून टाकलं आहे. लोहगडाच्या कड्यावरून धक्का देत होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतनचा जीव घेतला. दरम्यान सियाने म्हटलं होत की, बदनामीच्या भीतीने कोणाला चेतनबद्दल सांगूण लग्न मोडणे तिला योग्य वाटले नाही. ज्यामुळे तिने चेतनसोबत मिळून केतनला मारणाऱ्याचा डाव आखला.
दरम्यान केतनच्या हत्येचा उलगडा करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी काल लोहगडावर जाऊन संपूर्ण घटनेचे थरारक पद्धतीने 'सीन रीक्रिएशन' केलं. याबाबत आता आणखी मोठी अपडेट समोर आली आहे. सियाचे चेतनसोबत प्रेम संबंध असल्याचा केतनला संशय असल्याची नवीन माहिती मिळाली आहे. याबाबत केतनने त्याच्या वडिलांसोबत देखील चर्चा केली होती.
लग्न ठरल्यानंतर जेव्हा जेव्हा तो सियाला फोन करायचा तेव्हा सियाचा नंबर सातत्याने व्यस्त लागायचा. इतकचं नव्हे तर केतनसोबत असताना सिया नेहमीच चेतनचा विषय काढायची. त्यामुळे संशय आल्याने "तुम्ही सिया बाबत संपूर्ण माहिती घेतलीय का?" केतनने 2 वेळा वडिलांना प्रश्न विचारला होता. यावर "सिया आपल्या नात्यातील असल्याने असा काही नसेल" अशी केतनचे वडील यांनी त्याची समजूत काढली होती.
तर केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. लोहगडला जाण्यासाठी वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली असून लोहगड किल्ल्यावर जाण्यासाठी चेतन चौधरने दुचाकीचा वापर केला होता. सिया आणि केतन यांच्या पाठीमागे चेतनने त्याची दुचाकी नेली होती.
लोहगडला जाताना टोल नाक्यावर आपले वाहन दिसू नये यासाठी चेतनने दुचाकीचा वापर केला होता. पोलिसांच्या नजरेतून आणि संशयातून वाचण्यासाठी चेतनने ही शक्कल लढवली होती. दरम्यान केतन अग्रवाल हत्याप्रकरणातील आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार असल्यानं सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोन्ही आरोपींना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.