आचारसंहितेचा भंग होत असेल तर एका क्लिकवर करता येणार तक्रार

आचारसंहितेचा भंग होत असेल तर एका क्लिकवर करता येणार तक्रार

आचारसंहितेचा भंग झाल्यास आता नागरिकांना एका क्लिकवर निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

पुण्यात लोकशाही आणि निवडणूक सुशासन यावर आधारित कार्यशाळेच आयोजन करण्यात आलं होतं, यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ‘कॉप’ अॅप लाँच करण्यात आले.

निवडणूकीच्या आचारसंहितेचा भंग होत असेल किंवा निवडणूकी दरम्यान जर काही गैरप्रकार होत असतील तर त्याची तक्रार या अॅपवर करता येणार आहे.

याचबरोबर, लोकप्रतिनिधींनी दिलेली आश्वासनाबाबतची माहिती त्यांना दरवर्षी नागरिकांसमोर सादर करणं आवश्यक असेल.

आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीदरम्यान हा नियम लागू होणार आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version