जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
इस्राईलचे पंतप्रधान बेजामिन नेत्यन्याहू यांचे काल संध्याकाळी साडे आठच्या सुमारास मुंबईत आगमन झाले आहे. गुरूवारी दिवसभर इस्राईलचे पंतप्रधान मुंबईत विविध कार्यक्रमांमध्ये सामील होणार आहेत.
नेत्यन्याहूंचे मुंबईत भरगच्च कार्यक्रम आहेत. ऑडीच्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या अध्यक्षांसोबत नेत्यन्याहू चर्चा करणार आहेत. 130 इस्रायली आणि 250 भारतीय उद्योजकांसमोर ते भाषणही करणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेत्यन्याहूंबरोबर दुपारी महाराष्ट्र-इस्रायल सहकार्यावर चर्चा करणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.