शाहरुखचा लुक पाहून नेटकरी आश्चर्यचकित

शाहरुखचा लुक पाहून नेटकरी आश्चर्यचकित

मुंबई, १० जुलै प्रतिनिधी : बहुप्रतीक्षित ‘जवान’ या चित्रपटाची अखेर प्रतीक्षा संपली. नुकताच या चित्रपटाचा प्रीव्ह्यू प्रदर्शित करण्यात आला त्यानंतर आता प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या प्रीव्ह्यूमध्ये शाहरुखचा आश्चर्यचकीत करणारा लूक पाहून चाहते भारावून गेले आहेत. जवान या चित्रपटात शाहरुखचा फक्त एक नाही तर वेगवेगळे लूक पाहायला मिळणार आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जवान या चित्रपटाच्या प्रीव्ह्यूमध्ये शाहरुखने चक्क केलेले दिसून येत आहे. हे पाहताच शाहरुखच्या चाहत्यांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटवायला सुरुवात केली आहे.


‘जवान’ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची अनोखी उत्सुकता पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये शाहरुख एका स्टेशनवर बसल्याचे दिसून येत आहे. पण आता जवानचा प्रीव्ह्यू प्रदर्शित झाल्यानंतर शाहरुख खानचा लूक समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाला, “डेन्जरस दिसत आहे.” दुसरा नेटकरी म्हणाला, “मी कधी विचार केला नव्हता की टक्कल केल्यानंतरही कोणी इतकं चांगलं दिसेल.”

‘जवान’ या चित्रपटात शाहरुखचा डबल रोल पाहायला मिळणार आहे. तर शाहरुखसोबत या चित्रपटात नयनतारा, प्रियामणि, सुनील ग्रोव्हर आणि विजय सेतुपति महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version