एका आईची माया काय असते ? आपल्या मुलांसाठी केलेली धडपड, त्यांच्या भविष्याचा विचार. आई होणं सोपं गोष्ट नसून या विचारांमुळे रात्री झोप येत नसल्याची भावना बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. नेहा धुपिया आणि पती अंगद बेदी यांना कन्यारत्न झाली. दोघांना कन्यारत्न झाल्यानंतर त्यांनी मुलीचे नाव मेहेर ठेवले. नेहा धुपिया आपल्या मुलीसंदर्भात नेहमीच सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. यंदाही नेहाने मुलीला स्तनपान करतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्याचबरोबर एक भावनिक पोस्टही शेअर केली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया आणि अंगद बेदी 10 मे 2018 रोजी लग्नबंधनात अडकले.
नोव्हेंबर महिन्यात त्यांना कन्यारत्न झाले आणि चिमुकलीचा जन्म झाला.
नेहा धुपिया आपल्या मुलीसंदर्भात नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते.
यंदा स्तनपान करतानाचा फोटो नेहाने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
त्याचबरोबर एक भावनिक पोस्टही शेअर केली आहे.
नेहा धुपिया इन्स्टाग्रामवर #freedomtofeed ही मोहीम राबवत असून तिने आई होण्याचा अनुभव शेअर केला आहे.
त्यासोबतच स्तनपानाविषयी लोकांची जी मानसिकता आहे ती बदलण्याची विनंती केली आहे.
आई होणं वाटतं तितकं सोप नसून मुलीच्या विचारांमुळे रात्री झोप येत नाही.
एक आईच अशी व्यक्ती आहे जिच्या डोक्यात एकाचवेळी अनेक विचार सुरू असतात.
बाळाला स्तनपान करताना तिचं डोकं नीट ठेवलं आहे की नाही, तिचं पोट भरलं आहे की नाही असे विचार सतत येत आसतात.
स्तनपान करणं ही महत्त्वाची आणि सुंदर गोष्ट असल्याचे नेहाने म्हटलं आहे.
ब्रेस्टफींडिंग आणि ब्रेस्टपंप याच्याविषयी लोकांची जी मानसिकता आहे, ती बदलण्याची गरज आहे.
या विषयी मोकळेपणाने बोलायला हवं असेही नेहाने म्हटलं आहे.
प्रत्येक आईने आपला अनुभव शेअर करावा आणि हा अनुभव मी माझ्या इन्स्टाग्रामवर शेअर करेन असे पोस्टमध्ये म्हटलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.