लोणार शहराच्या स्वच्छतेकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष

लोणार शहराच्या स्वच्छतेकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार शहरात नगरपालिकेकडून शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. शहरातील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून, साचलेल्या पाण्यावर डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लोणार शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लोणार नगरपालिकेच्यावतीने शहरातील कचऱ्याचे व्यवस्थापन केले जात नसल्याने नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लोणार नगरपालिकेने तात्काळ शहराची स्वच्छता काटेकोरपणे करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करताना पाहायला मिळत आहेत.

जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ आणि जगातील दुसरं सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर म्हणून लोणार सरोवराची ओळख आहे. लाखो वर्षांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झाली. सुमारे 20 लाख टन वजनाची उल्का जोरदार वेगाने पृथ्वीवर आदळली. त्यामुळे पृथ्वीवर 1.8 व्यासाचा आणि 200 मीटर खोलीचा खड्डा तयार झाला. हेच ते लोणार सरोवर. लोणार सरोवर हे बेसॉल्ट खडकातील एकमेव आघाती विवर आहे. हे सुंदर आणि खाऱ्या पाण्याचं अनोखं सरोवर पाहण्यासाठी देशासह परदेशातूनही पर्यटक येतात.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version