जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
आता खासगी बसनं मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. इतर ठिकाणांहून खासगी बसनं मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना आता सकाळी 7च्या आत यावं लागणार आहे.
नाहीतर त्यांना मुंबईबाहेरच उतरावं लागेल. कारण सकाळी सातनंतर मुंबईत लक्झरी बसना एंट्री नाही. मुंबईतील वाहनांची वाढती संख्या आणि विविध प्रकल्पांचं काम यामुळे वाहतूककोंडी होत आहे.
त्यावर उपाय म्हणून मुंबईत लक्झरी बसना सकाळी सातनंतर प्रवेश दिला जाणार नाही. रस्त्यांच्या कडेला खासगी बस पार्कही करता येणार नाहीत.
पे अँड पार्कमध्येच या गाड्या पार्क कराव्या लागतील. वाहतूक पोलिसांनी तसं परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार सकाळी 7 ते सकाळी 11 आणि सायंकाळी 5 ते रात्री 10 वेळेत लक्झरी बसना मुंबईत प्रवेश मिळणार नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.