NEET-UG Paper Leak Case : स्वत:च्या मुलासाठी पेपर फोडला?; मोटेगावकरविरोधात NEET पेपरफुटीप्रकरणी तपासात CBI च्या हाती भक्कम पुरावे

NEET पेपरफुटी प्रकरणी सीबीआयच्या तपासादरम्यान नवनवीन खुलासे आणि धक्कादायक माहिती आता समोर येत आहे.
NEET-UG Paper Leak Case : स्वत:च्या मुलासाठी पेपर फोडला?; मोटेगावकरविरोधात NEET पेपरफुटीप्रकरणी तपासात CBI च्या हाती भक्कम पुरावे

नवी दिल्ली : देशभरात चर्चेत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणी लातूरमधील प्रसिद्ध RCC कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) ताब्यात घेतले आहे. सीबीआयच्या तपासादरम्यान नवनवीन खुलासे आणि धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. लातूरमधील नामांकित 'आरसीसी' (RCC) कोचिंग इन्स्टिट्यूटचा संचालक शिवराज मोटेगावकर याला दिल्लीच्या विशेष न्यायालयाने 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. तत्पूर्वी सीबीआयने ताब्यात घेतल्यानंतर गेल्या दोन दिवसांच्या कसून चौकशीत मोटेगावकरच्या विरोधात अत्यंत भक्कम आणि महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मोटेगावकर याने स्वत:च्या मुलासाठी NEET पेपर फोडल्याचा संशय सीबीआयला असल्याचे समजते. 

हेही वाचा : NEET चे धागेदोरे RCC पर्यंत, शिवराज मोटेगावकरला CBI कडून अटक; कोण आहे मोटेगावकर?

सध्या सीबीआयकडून मोटगावकरच्या लातूर येथील घरावर छापेमारी सुरू आहे. या तपासात सीबीआयला त्याच्या घरातून 'केमिस्ट्री' (रसायनशास्त्र) विषयाची नीट परीक्षेची मूळ प्रश्नपत्रिका हाती लागली आहे. दोन दिवसांपूर्वी लातुरात प्रा. कुलकर्णी याला सीबीआयने अटक केली. एनटीएमध्ये (परीक्षा प्रक्रिया) कुलकर्णी याच्याकडे महत्त्वाची जबाबदारी होती. त्यानेच ही प्रश्नपत्रिका मोटेगावकर याला दिल्याचा संशय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी शिवराज मोटेगावकर याचा स्वतःचा मुलगा देखील बारावीत होता. त्याने नीटची परीक्षा दिली होती. त्यामुळे मोटेगावकराने स्वतःच्या मुलाला वैद्यकीय प्रवेशासाठी जास्तीत जास्त गुण मिळावेत, याच उद्देशाने नीटचा पेपर फोडला असावा, यादृष्टीने सीबीआय आता कसून तपास करत आहे. 

दरम्यान, मोठेगावकर यांना अटक झाल्यानंतर आता नाशिकमधून आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. काही विद्यार्थी आरसीसी क्लासच्या शाखेत प्रवेशासाठी गेले असता, तेथील मॅनेजमेंटने त्यांना धक्कादायक आश्वासन दिल्याचा दावा समोर आला आहे. “आमच्या बुकलेटमधील 180 पैकी 180 प्रश्न नीट परीक्षेत विचारले जातात. त्याची सिक्युरिटी देखील आम्ही देऊ शकतो,” असे सांगण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. इतकेच नव्हे, तर “देशभरातील प्रत्येक शासकीय आणि खासगी मेडिकल कॉलेजमध्ये तुम्हाला आमच्या क्लासचा विद्यार्थी दिसेल,” असेही मॅनेजमेंटकडून सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे कोचिंग नेटवर्क, विद्यार्थ्यांना दिली जाणारी ‘गॅरंटी’ आणि संशयास्पद दावे यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. आता या दाव्यांमागे नेमकं सत्य काय ?,  विद्यार्थ्यांना ‘रिझल्ट’च्या नावाखाली काही वेगळंच दाखवलं जात होतं का?, असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version