NEET पेपरची विक्री 15 लाख रूपयांना? पेपरफुटीबाबत मोठी धक्कादायक माहिती समोर

नीट पेपरफूटी प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण घेवाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
NEET पेपरची विक्री 15 लाख रूपयांना? पेपरफुटीबाबत मोठी धक्कादायक माहिती समोर

देशभरात आज नीट परिक्षेचा गोंधळ समोर आला आहे. 3 मे रोजी झालेला पेपर फुटल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटीवर आता नाशिक कनेक्शनही समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फुटलेल्या प्रश्नपत्रेची पहिली प्रत ही नाशिकमध्ये तयार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. हीच प्रत हरियाणाला पोहोचली, जिथे या फुटलेल्या प्रश्नपत्रेचे 10 संच (sets) तयार करण्यात आले. 

त्यानंतर, या फुटलेल्या प्रश्नपत्रिकेने मोठा प्रवास केला. पुढे हरियाणातून बिहार, आंध्र प्रदेश, जम्मू आणि काश्मीर तसेच राजस्थान या राज्यांमध्ये प्रश्नपत्रिका पोहोचली. या प्रकरणात नाशिकमधून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित व्यक्तीला इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले आहे.

30 वर्षीय युवकाला अटक

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 30 वर्षीय युवकाला अटक केली आहे. संशयित आरोपीने BAMS शिक्षण घेतले असल्याची माहिती असून तो मूळचा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील रहिवासी आहे. राजस्थान CBI कडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. 

आर्थिक देवाण घेवाण

नीट पेपरफूटी प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण घेवाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकच्या आरोपीने अहिल्यानगर मधील आरोपीकडून 10 लाख रुपयात प्रश्नपत्रिका विकत घेऊन हरियाणा मधील आरोपीला 15 लाख रुपयात विकल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. नाशिकच्या संशयित आरोपीने 10 लाख रुपयात प्रश्नपत्रिका विकत घेऊन 15 लाख रुपयांत विकल्याचं समोर आलं आहे. 

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक पोलिसांनी आरोपीचे नाव, मोबाईल नंबर आणि पत्त्याच्या आधारे त्याचा शोध घेत अटक केली, संबंधित युवकाची मेडिकल काऊन्सलिंग एजन्सी आहे. नीट प्रकरणातील पेपरफुटी प्रकरणानंतर आरोपीने पोलिसांपासून बचावासाठी हेअरस्टाईल बदलल्याचे प्राथमिक तपासातून उघड झालं आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version