जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई
बँक ऑफ बडोदामध्ये दरोडा पडवल्यानंतर बँक कर्मचाऱ्यांकडून खातेदारांना कोणतही सहकार्य मिळत नसल्याचं शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी सांगितलंय.
याप्रकरणी नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहलयं. खातेदारांना योग्य सहकार्य मिळावं आणि नियमावलीत सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी नीलम गोऱ्हे यांनी पत्राद्वारे केलीय.
खातेदारांना स्वतः पोलीस स्थानकात जाऊन तक्रार दाखल करण्यास सांगितले जात असल्याचंही त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.