प्रियांकाच्या गळ्यातील हाराची का होतेय चर्चा?

प्रियांकाच्या गळ्यातील हाराची का होतेय चर्चा?

मुंबई, १ मे २०२३, प्रतिनिधी : मेट गाला हा जागतिक स्तरावर होणार लोकप्रिय फॅशन शो आहे. बॉलीवूड पासून हॉलिवूड पर्यंत सगळीकडेच या शोची चर्चा असते. नुकताच न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट पहिल्यांदाच मेट गालाच्या रेड कार्पेटवर चालताना दिसली.दरम्यान या वर्षी सुद्धा नेटकऱ्यांचे लक्ष वेधले ते म्हणजे अभिनेत्री प्रियांका चोप्राने. यावेळी प्रियांकाचा पेहराव पाहून नेटकरी भारावून गेले आहेत तर तिच्या पेहरावापेक्षा तिच्या गळ्यातील हिऱ्यांच्या हाराकडे सगळ्यांच्या नजर वळल्यात. विशेष म्हणजे या हाराची किंमत ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल.

ग्लोबल अभिनेत्री प्रियांकाने मेट गाला 2023 या फशुईओं शो मध्ये 11.6-कॅरेटचा हिऱ्यांचा हार घातला होता. हा हार स्टेटमेंट पीस बुल्गारी यांनी तयार केला होता. विशेष म्हणजे या शानदारहाराची ची किंमत 25 मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 204 कोटी रुपये आहे. दरम्यान या सोहळ्यानंतर प्रियंका चोप्राच्या या 25 मिलियन डॉलर्सच्या बल्गारी नेकलेसचा लिलाव केला जाणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version