‘तीन राज्यांमध्ये राष्ट्रवादी निवडणूक लढणार’ – शरद पवार

‘तीन राज्यांमध्ये राष्ट्रवादी निवडणूक लढणार’ – शरद पवार

देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. गोवा, मणिपुर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूका पार पडणार आहे. या पाच राज्यांपैकी तीन राज्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढणार असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले आहे.

उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर या तीन राज्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीच्या रिंगणात असणार असल्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जाहीर केले आहे. दरम्यान गोवा आणि उत्तर प्रदेश राज्यांमध्ये परिवर्तनाची गरज असल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादीकडून उत्तर प्रदेशात काँग्रेसला सुरूंग असल्याचेही ते म्हणाले. उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे माजी आमदार सिराज मेहंदी यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला आहे. दरम्यान उत्तर प्रदेशात राष्ट्रवादीची समाजवादी पक्षासोबत युती असणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे. दरम्यान शरद पवार लवकरच उत्तर प्रदेश राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

राष्ट्रवादी उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूरमध्ये निवडणूक लढवणार आहे. तर गोव्यात परिवर्तन करण्याची गरज असल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे. तसेच गोव्यामध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेससोबत एकत्र लढण्याच्या विचारात असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले आहे.

असे होणार मतदान

पंजाब, गोवा, उत्तराखंड या तीन राज्यांमध्ये १४ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार आहे. तर मणिपुरमध्ये दोन टप्प्यांमध्ये निवडणुक होणार आहे. पहिला टप्पा २७ फेब्रुवारी तर दुसरा टप्पा ३ मार्च रोजी होणार आहे. आणि उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. पहिला टप्पा १० फेब्रुवारी, दुसरा टप्पा १४ फेब्रुवारी, तिसरा टप्पा २० फेब्रुवारी, चौथा टप्पा २३ फेब्रुवारी, पाचवा टप्पा २७ फेब्रुवारी, सहावा टप्पा ३ मार्च आणि सातवा टप्पा ७ मार्च रोजी निवडणूक होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version