राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काढला तिरडी मोर्चा

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काढला तिरडी मोर्चा

 

जय महाराष्ट्र न्यूज, मावळ 

 

राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज आणि वीजबील माफ करावे तसंच सात बाराचा उतारा कोरा करावा या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्याकरता  मावळ तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तिरडी मोर्चा काढला.

 

या मोर्चात मावळ तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजीसुद्धा केली. तसेच सरकारी अनास्थेचा निषेध करत शासनाची मावळ तहसिल कार्यालयापर्यंत प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version