भुजबळ यांना जामीन मंजूर, कार्यकर्त्यांचा जल्लोष

भुजबळ यांना जामीन मंजूर, कार्यकर्त्यांचा जल्लोष

जय महाराष्ट्र न्युज, नाशिक

राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्यानंतर आज राज्यात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. जामीन मिळाल्याची बातमी नाशिकमध्ये येताच राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते भुजबळ फार्म आणि राष्ट्रवादी भवन बाहेर मोठया प्रमाणात गर्दी करून जल्लोष केला.

फटाके वाजवून आणि पेढे वाटुन कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. नाशिकचा वाघ बाहेर आला, अशा प्रकारच्या घोषणा यावेळी कार्यकर्ते देत होते. ढोल तासांच्या आवाजावर अनेक नेत्यांनी तर ठेका देखील लगावला. नाशिकसह संपुर्ण जिल्ह्यात भुजबळांना जामीन मिळाल्यानंतर अनेकांनी आनंद व्यक्त केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version