मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांच्या हाती गेल्यानंतर पक्षात अंतर्गत कलह सुरू असल्याच्या अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या. त्यातील सर्वात खळबळजनक बाब म्हणजे पक्षातील ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नाराजी, हा विषय. या मुद्दावर उलटसुलट माहिती येत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता सूरज चव्हाण यांनी माध्यमांसमोर येत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
चव्हाण यांनी म्हटले की, राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांना मी सांगतो की पक्षात कोणतीही चलबिचल, कोणतीही नाराजी नाही. सुनेत्रा पवारवहिनी, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे पक्षाचे नेते असून योग्य कारवाई सुरू आहे. कोणताही राजकीय अर्थ काढू नये. पार्थदादा हे खासरदार आहेत, त्यांचे काहीतरी विषय असतील. त्यासाठी गेले होते. त्यांचा आणि सध्याच्या स्थितीचा काही संबंध नाही. आमच्या पक्षाच्या कोणत्याही आमदारांनी पवारसाहेबांची भेट घेतली नाही. जर घेतली असेल तर ती त्यांच्या स्वास्थ्याची विचारपूस करण्यासाठी असेल. रोहितदादा हे जाणिवपूर्वक मतभेद कसे निर्माण होतात, असे प्रयत्न करत आहेत. ते अजितदादा यांच्या मृत्यूपासून सुरू झालेल्या आहे. ते अजून सुरू आहे. आपण जर बातम्या पाहिल्या असतील तर त्यांना जाणीवपूर्वक कोण सांगतोय, तर रोहितदादा सांगत आहे.
सुनेत्रीवहिनींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. येत्या काळात पक्षवाढीसाठी काम करत राहतील. त्यांच्या नेतृत्वात सगळे काही सुरळीत सुरू आहे. त्यात त्यांची ऑडिओक्लीप माझ्याकडे नाही, कोणता नेता बोलला हेही माहिती नाही. ऐकीव माहितीनुसार हे मी बोलत आहे. दादांसारख्या ज्येष्ठ नेत्याने असे करू नये. त्यातून संभ्रम निर्माण होतो. त्यांनी एजन्सीसुद्धा हायर केली आहे. त्यांनी त्यांच्या पक्षात लक्ष घालावे. येत्या काळात वहिनी बैठक घेऊन पत्र देतील. सह्या घेणारे रोहितदादा होतेच. भाजप बरोबर जावे म्हणून मनधरणी करणारे नेते रोहितदादा होते. आता त्यांना काय साक्षात्कार झाला ते मला माहिती नाही, याबाबत मला माहिती नाही. त्याबाबत बैठक होईल, असेही सूरज चव्हाण यांनी स्पष्ट केले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.