महिला डॉक्टारांवरील अत्याचाराचा राष्ट्रवादीकडून निषेध 

कोलकता येथील महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ शनिवारी नागपुरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार निदर्शन करण्यात आले.
महिला डॉक्टारांवरील अत्याचाराचा राष्ट्रवादीकडून निषेध 

१७ ऑगस्ट, २०२४, नागपूर : कोलकता येथील महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ आणि डॉक्टरांवर होणाऱ्या सतत हल्ल्याच्या विरोधात शनिवारी नागपुरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार निदर्शन करण्यात आले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम आणि शहराध्यक्ष प्रशांत पवार यांच्या यांच्या उपस्थितीत हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. या प्रकरणाचा सखोल तपास करुन दोषींना फाशी द्यावी अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version