मुंबई : एकीकडे केंद्रात राजकीय घडामोडींना वेग आला असून दुसरीकडे महाराष्ट्रातूनही नवनवीन घटना समोर येत आहेत. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली असून त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याबाबतची माहिती स्वतः सुनील तटकरे यांनी एक्स पोस्टद्वारे दिली असून या भेटीमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
देशाचे केंद्रीय गृहमंत्री माननीय श्री. @AmitShah जी यांची आज #नवीदिल्ली येथे सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. pic.twitter.com/fz5TyVyi51 — Sunil Tatkare (@SunilTatkare) July 27, 2026
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.