NCP-Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय घडतंय? बड्या नेत्याने घेतली शरद पवार यांची भेट

राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे आमदार मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवासस्थानी शरद पवार यांच्या भेटीला गेले.
NCP-Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय घडतंय? बड्या नेत्याने घेतली शरद पवार यांची भेट

सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलांनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बड्या नेत्याने शरद पवार यांची भेट घेतली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री व आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनी मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतली. त्यासंदर्भातील फोटोही समोर आलेले आहेत. मागील अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे.

त्यामुळे या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या घडामोडींना वेग आलेला दिसत आहे. या भेटीत त्यांनी राज्यातील ज्वलंत कांदा प्रश्न, सहकार क्षेत्र व सहकारी संस्थांशी निगडीत विविध विषय, त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भातील वेगवेगळ्या विषयांवरती सखोल चर्चा केली.

सध्या कांद्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांसाठी कांद्याच्या दराचा प्रश्न गंभीर बनला आहे, अशातच शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. त्यामुळे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने शेती प्रश्न विषयी त्यांच्या चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. ही भेट राजकीयदृष्ट्या महत्वाची मानली जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version