राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल करत कोल्हापुर, सोलापुर दणाणून सोडलं

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल करत कोल्हापुर, सोलापुर दणाणून सोडलं

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

 

कोल्हापूर आणि सोलापुरात राष्ट्रवादीच्या वतीनं हल्लाबोल आंदोलन करण्यात आलंय. सोलापुरात राज्य सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं सुरु केलेल्या शेतकऱ्यांच्या खोट्या कर्जमुक्ती विरोधात हे आंदोलन करण्यात आलंय.

वारंवार पोकळ आश्वासनं देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केलाय. याच्या निषेधार्थ राष्ट्रावादीच्या वतीनं सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  हल्लाबोल आंदोलन केलंय.

तर, कोल्हापुरातहीराष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत हल्लाबोल आंदोलन केलंय. यावेळी कर्जमाफी प्रकरणी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोपही करण्यात आलाय. या मोर्चावेळी सरकार विरोधी घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर आंदोलकांनी दणाणून सोडला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version