राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याने पंकजा मुंडे समवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने खळबळ

राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याने पंकजा मुंडे समवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने खळबळ

जय महाराष्ट्र न्यूज, बीड

 

राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी पंकजा मुंडे समवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने बीडच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीय.

जयदत्त क्षीरसागर हे छगन भुजबळ गटाचे मानले जातात. पण राष्ट्रवादीने गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्याच्या राजकारणात धनंजय मुंडे यांना बळ दिल्याने जयदत्त क्षीरसागर काहीसे नाराज होते.

बीडच्या राजकारणात धनंजय मुंडे यांना काटशह देण्यासाठीच पंकजा मुंडेंनी सुरेश धस यांच्यापाठोपाठ जयदत्त क्षीरसागर यांनाही भाजपात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचं बोललं जातंय. या भेटीमुळे जयदत्त क्षीरसागर यांच्या भाजप प्रवेशासंबंधीच्या राजकीय चर्चेने पुन्हा जोर धरलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version