‘बॉम्ब’ वादळाने नायगारा धबधबा गोठला

‘बॉम्ब’ वादळाने नायगारा धबधबा गोठला

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

अमेरिकेत बॉम्ब नावाच्या चक्रीवादळाने पूर्व किनाऱ्याला फटका दिला असून तेथे मोठय़ा प्रमाणात हिमवृष्टी झाली तर गोठवणारी थंडी पडली आहे. त्यामुळे या भागात प्रवास करणे अशक्य बनले आहे. या वादळात आतापर्यंत आग्नेयेकडील उत्तर व दक्षिण कॅलिफोर्नियात चार जण मरण पावले असून बर्फाळ रस्त्यावर वाहने चालवणे अशक्य बनले आहे.

राष्ट्रीय हवामान वेधशाळेच्या म्हणण्यानुसार या भागात तापमान कमालीचे घसरले असून थंड वारे वाहत आहेत.

अमेरिकेच्या अनेक भागांत थंडीची लाट पसरली असून त्यात काही जणांचे मृत्यू झाले आहेत. अनेक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली असून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version