जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली
नक्षलवादी कारवायांचा सर्वाधिक फटका महाराष्ट्र, छत्तीसगडच्या सीमा भागांना बसतो. नक्षलवादी कारवायांमुळे अनेक जवान आणि नागरिकांचा नाहक बळी जातो. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा मुद्दा केंद्रासमोर उपस्थित केला आहे.
नक्षलवाद्यांसह त्यांच्या बुद्धिजीवी पाठिराख्यांच्याही मुसक्या आवळणे आवश्यक असल्याची सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीत पार पडलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत केली.
छत्तीसगडमधील सुकमा येथे नक्षलवाद्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर केलेल्या भीषण हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी नक्षलग्रस्त दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित केली होती.
नक्षलवाद्यांच्या कारवाया ही आपल्यासाठी चिंतेची बाब आहेच. पण त्यांचे बुद्धिजीवी पाठीराखे देखील चिंतेची बाब आहे. देशातील विविध विद्यापीठांमध्ये त्यांचे बुद्धिजीवी पाठीराखे ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्याही मुसक्या आवळणे आवश्यक आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.