माओवाद्यांच्या हल्ल्यात 1 जवान शहीद

माओवाद्यांच्या हल्ल्यात 1 जवान शहीद

वृत्तसंस्था, ओडीशा

 

ओडीशामध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात 1 जवान शहीद तर 10 जवान जखमी झाले. कंधमाल जिल्ह्यात बालिगुड्डा क्षेत्रात कोम्बिंग ऑपरेशन करुन परतत असताना दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी जवानानवर हल्ला केला.

 

जवानांनीही चोख प्रतिउत्तर देत हल्ला परतवून लावला. जखमी जवानांवर उपचार सुरू असून, 3 जणांवर बालीगुड्डा मधील हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. तर, गंभीर जखमी जवानाला ब्रम्हपूरच्या MKCG मेडीकल कॉलेजमध्य़े दाखल करण्यात आलं. शहीद जवानाचं नाव लक्ष्मीकांत जानी सांगण्यात येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version