वृत्तसंस्था, दिल्ली
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम नवाज यांंना लाहोर विमानतळावर कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, त्यांच्या अटकेआधी पाकिस्तानात मोठा तणाव निर्माण झाला असून लाहोरमध्ये काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. तसेच, नवाज शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाचे कार्यकर्ते मोठया संख्येने विमानतळ परिसरात जमले आहेत.
काही ठिकाणी हिंसकवळण आले असून पोलिसांनी 378 जणांना ताब्यात घेतले आहे. याचबरोबर, लाहोर विमानतळाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.