नवाब मलिकांचा तुरूंगवास सुरूच

नवाब मलिकांचा तुरूंगवास सुरूच

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी आर्थिक हितसंबंध आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आजही न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. नेते नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर आज महत्वपूर्ण सुणावनी पार पडली. आज तरी मलिकांना नक्की जामीन मिळणार अशी नवाब मलिकांच्या वकिलांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यां अपेक्षा होती पण शुक्रवारी देखील पुन्हा एकदा मलिकांच्या अपेक्षांना भंग पावला आहे. गुरुवारच्या सुनावणी दरम्यान नवाब मलिकांना कुठलाही दिलासा मिळाला नाही. तरी मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. सध्या नवाब मलिक यांची प्रकृती ठीक नसुन कुर्ला येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

दाऊद इब्राहीम टोळी, क्रिकेटवरील सट्टेबाजी आणि बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करत असल्याच्या आरोपावरून ‘ईडी’ने दाऊद आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ‘ईडी’ने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली होती. दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे ‘ईडी’ला तपासात आढळलं होतं. त्यानुसार ‘ईडी’ने अटकेची कारवाई केली होती.

२३ फेब्रुवारी रोजी पहाटे पाचच्या सुमारास ‘ईडी’चे अधिकारी मलिक यांच्या कुर्ला येथील निवासस्थानी पोहोचले होते. यानंतर त्यांना ईडी कार्याललायत नेण्यात आलं होतं. सकाळी साडेसातच्या सुमारास मलिक यांना ‘ईडी’च्या बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात आणण्यात आले. सुमारे साडेसात तास चौकशी केल्यानंतर मलिक यांना दुपारी पावणे तीनच्या सुमारास अटक करण्यात आली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version