जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई
नवी मुंबई स्थायी समिती सभापती पदी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचाने बाजी मारली आहे. राष्ट्रवादीच्या शुभांगी पाटील यांनी 16 पैकी 9 मत मिळवत सभापती पदी विराजमाना होण्याचा मान मिळवला.
या निवडणूकीत कॉंग्रेसच्या मीरा पाटील यांचं मत महत्वाच मानला जात होत. आणि हे मत राष्ट्रवादीच्या पारड्यात पडलं. नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी कॉग्रेस आणि कॉग्रेस यांची आघाडी आहे, यात स्थायी समित्तीत राष्ट्रवादी कॉग्रेसचे 8 सदस्य आहेत.
तर, कॉग्रेसचा एक सदस्य, आणि शिवसेनेचे 6 सदस्य तर भाजपचा एक सदस्य आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सभापती पदासाठी रस्सीखेच सुरु होती. त्यात राष्ट्रवादीने बाजी मारली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.