महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या घडामोडींमध्ये अजित पवारांबद्दल सातत्याने भाजप प्रवेशाच्या चर्चांनंतर आता पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली आहे. सध्या राष्ट्रवादीची भाजपसोबत बोलणी सुरु असल्याचे खळबळजनक वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.
कर्नाटकामधील निपाणी मतदारसंघात प्रचारादरम्यान त्यांनी “राष्ट्रवादी काँग्रेस किती दिवस काँग्रेससोबत राहिल हे माहित नाही”, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात राष्ट्रवादीने उमेदवार दिला आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. मात्र पृथ्वीराज चव्हाणांच्या या वक्तव्याने राजकारणात खळबळ माचली आहे.
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पक्षाध्यक्ष पदाच्या दिलेल्या राजीनाम्याला कार्यकर्त्यांनी विरोध केला. तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शरद पवारांच्या निर्णयांचं समर्थन केलंय. या घटनेमुळे राष्ट्रवादी पक्षात तेढ निर्माण झालेला असताना खरंतर चव्हाण यांनी मंगळवारी याबाबतच सूचक वक्तव्य केले आहे.
पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
“राष्ट्रवादी काँग्रेसने इथे आपला उमेदवार उभा केलाय असं मी ऐकलंय. काय झालंय ते अजून आमच्यासोबत आहेत. किती दिवस थांबतील माहित नाही कारण भाजपसोबत रोज बोलणी सुरु आहे. रोज पेपरमध्ये बातम्या येताती की कोण नेता जाणार, कोण थांबणार. त्यांनी काय निर्णय घ्यायचा हे त्यांनी ठरवावं. पण काय झालंय राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा रद्द झाला आहे. त्यामुळे इतर राज्यात जाऊन स्वत:ची टक्केवारी वाढली तर पुन्हा आपल्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल असं त्यांना वाटत असावं”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.