धीरेंद्र शास्त्री विरोधात राष्ट्रवादी आक्रमक

धीरेंद्र शास्त्री विरोधात राष्ट्रवादी आक्रमक

मागील काही दिवसांपासून चर्चेत असणारे बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांनी भक्तांचे श्रद्धासबुरी साईबाबा यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. साईबाबा हे संत असू शकतात, फकीर असू शकतात पण देव नाही, असं वादग्रस्त वक्तव्य धीरेंद्र शास्त्री यांनी केले आहे. तसेच, कोणीही कोल्ह्याची कातडी धारण करू सिंह होऊ शकत नाही. एक कोल्हा एक कोल्हाच राहील, असेही धीरेंद्र शास्त्री म्हणाले.  या वक्तव्यावरून राजकीय नेत्यांनी निषेध व्यक्त धीरेंद्र शास्त्रीवर जोरदार टीका केली आहे.

धीरेंद्र शास्त्री यांनी साईबाबा यांची वादग्रस्त वक्तव्य केल्यांनतर राजभरातुन तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. साईबाबांबद्दल बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करणार का?, असा सवाल राष्ट्रवादीकडून करण्यात आला. तसेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट केले की, ‘कालिचरण महात्मा गांधींना काय वाटेल ते बोलतो, ‘बागेश्वर साईबाबांचा अपमान करतो काय वाट्टेल ते बोलतो’. ‘महाराष्ट्रातील प्रजा सोशिक आहे, त्यांना राग येत नाही. तर, सरकार नपुंसक असून कोणी ही या कोहीही बोला, कुणालाही बोला, सरकार काही करणार नाही, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

धीरेंद्र शास्त्री काय म्हणाले?

जबलपूरमधील एका कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्री म्हणाले, शंकराचार्य यीं साईबाबा यांना देवाचे स्थान दिले नाही. आणि शंकराचार्य यांचे म्हणणे समजून घेणे हे आपले कर्तव्य आहे. साईबाबा संत असू शकतात, फकीर असू शकतात, पण देव असू शकत नाहीत. कोल्ह्याची कातडी पांघरून कोणी सिंह होऊ शकत नाही, देव देव आहेत, संत संत आहेत. त्यामळे साई हे देव नाहीत हे शंकराचार्य यांचे विधान प्रमाण असल्याचे बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version