वृत्तसंस्थ, नवी दिल्ली
हिंदू महासभेने महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचं मंदिर तयार केलंय. विशेष म्हणजे प्रशासनाची कोणताही परवानगी नसतानाही हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी ग्वाल्हेरमध्ये नथुराम गोडसेचं मंदिर उभारलंय.
कार्यकर्त्यांनी गोडसेची मूर्ती तयार केली असून यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.याप्रकरणी कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचे पडसाद मध्य प्रदेशच्या विधानसभेतही पाहायला मिळाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.