नाशकात महिला टोळीचा धुमाकुळ; 60 हजारांच्या साड्या केल्या लंपास

नाशकात महिला टोळीचा धुमाकुळ; 60 हजारांच्या साड्या केल्या लंपास

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

नाशिकमध्ये सध्या महिला गँग धुमाकुळ घालत असल्याचं समोर आलंय. अशीच एक घटना नाशिकच्या राजीवनगर भागातील ड्रीम वर्ड कपड्याच्या दुकानात घडलीय. ग्राहक म्हणून येत या महिलांनी दुकानातील कामगारांचा लक्ष चुकवत तब्बल 60 हजारांच्या साड्या लंपास केल्यात. मात्र, हे सर्व दृश्य दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं आहे.

दुकान मालकाच्या तक्रारी वरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय, पोलीस आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या चोरट्या महिलांचा शोध घेत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version