नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंचा दबदबा, प्रशासकीय कामकाजाला शिस्त लावण्यासाठी मुंढेचे कठोर निर्णय

नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंचा दबदबा, प्रशासकीय कामकाजाला शिस्त लावण्यासाठी मुंढेचे कठोर निर्णय

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तसेच प्रशासकीय कामकाजाला शिस्त लावण्यासाठी काही कठोर, परंतु धाडसी आणि उपयुक्त निर्णय घेतले.

यावेळी नाशिक मनपाच्या कर वसुली विभागातील पाच कर्मचाऱ्यांवर मुंढेंनी कारवाईचा बडगा उगारला आहे. घरपट्टी वसुलीत कामचुकारपणा केल्याचा ठपका ठेऊन मुंढेनी कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं.

दहा दिवसांची नोटीस बजावल्यानंतर, नाशिकरोड विभागीय कार्यालयातील वरिष्ठ आणि कनिष्ठ लिपिकासह 3 आरोग्य कर्मचाऱ्यांच निलंबन करण्यात आलं. सध्या नाशिक मनपाची स्थिती पाहून तुकाराम मुंढेंनी अनेक विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचं दिसतंय.

नाशिकरोड विभागीय कार्यालयातील वरिष्ठ लिपिक, सातपूर कार्यालयातील कनिष्ठ लिपिक यांसह 3 आरोग्य कर्मचाऱ्यांना निलंबीत केलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version