शिवप्रेमींनी आपल्या महाराजांना अशी मानवंदना दिली की तो वर्ल्ड रेकॉर्डच बनला

शिवप्रेमींनी आपल्या महाराजांना अशी मानवंदना दिली की तो वर्ल्ड रेकॉर्डच बनला

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा नाशिकमधे अभूतपूर्व वातावरणात संपन्न झाला. नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानापासून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली.

हजारो शिवभक्तांनी यावेळी घोषणाबाजी करत महाराजाना मानवंदना दिली. एकाच वेळेस एवढ्या मोठ्या संख्येनं मानवंदना देण्याच्या या घटनेची नोंद जिनियस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि वंडर बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये करण्यात आली.

पहिल्यांदाच नाशिक मध्ये सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटनांनी एकत्रित पणे येत शिवजयंती साजरी करण्यात येत आहे.  त्यामुळे यंदाच्या वर्षी एक वेगळाच आनंद नाशिक मध्ये पाहायला मिळाला. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version