सप्तशृंगी गडावर देवीचं दर्शन घेऊन घरी परत असताना ते थोडक्यात बचावले

सप्तशृंगी गडावर  देवीचं दर्शन घेऊन घरी  परत असताना ते थोडक्यात बचावले

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिकच्या सप्तश्रृंगी घाटात एका कारवर दरड कोसळली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. मात्र, दोन जण

यात किरकोळ जखमी झाले आहेत. कारचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 

पुणे येथील एक कुटुंब गडावर सप्तश्रृंगी देवीचं दर्शन घेऊन परत घरी जात असताना ही घटना घडली. दरड कोसळल्याने गडावर

जाणारा वाहतूकीसाठीचा रस्ता बंद करण्यात आला आहे. स्थानिक लोकांच्या मदतीने दरड हटवण्यात आली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version