राष्ट्रीय स्पॉटबॉलपट्टू हर्षदा माळवे अपघातात जखमी; उपचारासाठी पैसे नसल्याने कुटुंबिय हतबल

राष्ट्रीय स्पॉटबॉलपट्टू हर्षदा माळवे अपघातात जखमी; उपचारासाठी पैसे नसल्याने कुटुंबिय हतबल

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिकची राष्ट्रीय स्पॉटबॉलपट्टू हर्षदा माळवेच्या दुचाकीला पोलिसाच्या वाहनानं धडक दिलीय. यात हर्षदाआणि तिच्या आईला गंभीर दुखापत झालीय.

हर्षदा आणि तिच्या आईवर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  हर्षदाच्या घरची परिस्थिती हलाकीची असल्यानं उपचारासाठी पैसे कुठून आणायचे असा प्रश्न हर्षदाच्या कुटुंबियांसमोर पडलाय.

तर, दुसरीकडे अपघाताला कारणीभूत असलेल्या सुनील पाचरणे या पोलीस कर्मचाऱ्याला  वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस आहेत. दरम्यान, हर्षदा शुद्दीवर आल्यानंतर गाडीचालकाला ताब्यात घेऊन चौकशी करू अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version