स्कॅनर आणि प्रिंटरच्या मदतीनं छापायचे दोन हजारची नोट छापणारे अटकेत

स्कॅनर आणि प्रिंटरच्या मदतीनं छापायचे दोन हजारची नोट छापणारे अटकेत

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशकात 2 हजाराच्या बनावट नोटा छापणाऱ्या ठगांना ताब्यात घेतले. हे ठग स्कॅनग आणि प्रिंटरच्या मदतीने 2 हजाराच्या नोटा छापायचे.

 

आकाश भावसार आणि संतोष तमखानेला ताब्यात घेतले.

 

आरोपींक़डून 2 हजारांच्या 6 बनावट नोटांसह काही साहित्य जप्त केले.

 

त्यांनी छापलेल्या काही बनावट नोटा चलनामध्ये असल्याचा संशय पोलिसांना आहे.

 

त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना सावधान राहण्याचा इशारा दिला आहे.

 

500 आणि 2000 हजाराच्या नोटा घेण्याआधी पडताळून पाहण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version