ट्रेकींगची हौस जीवावर बेतली

ट्रेकींगची हौस जीवावर बेतली

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

 

ट्रेकींगची हौस एका तरुणाच्या जीवावर बेतली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील विश्रामगड किल्ल्यावरुन दरीत पडून

तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

 

नाशिक येथे राहणारा अभिषेक उपाध्ये (26) हा तरुण आपल्या मित्रांसह विश्रामगड येथील पाचपट्टा किल्ल्यावर ट्रेकींगसाठी आला होता.  

 

यावेळी किल्ल्यावर चढाई करत असताना अभिषेकचा पाय अचानक घसरल्याने तो किल्ल्यावरुन खाली खोल दरीत पडला असल्याचे समजते.

 

रविवारी रात्रीपासून अकोले पोलीस आणि काही स्थानिक नागरिक अभिषेकचा दरीत शोध घेत होते. मात्र, सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला असून अभिषेकच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version