जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
नाशिकच्या दिंडोरीतील मद्यनिर्मिती कंपनीतून नांदेड जिल्ह्यासाठी पाठविलेल्या लाखो रुपये किमतीच्या मद्यसाठ्या जप्त करण्यात आला. परस्पर अपहार करणाऱ्या ट्रकचालक-मालकासह आठ संशयितांना आडगाव पोलिसांनी अटक केली. या संशयितांकडून 28 लाख रुपयांचा मद्याचा साठा जप्त केला असून, संशयितांवर अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
कंपनीचे मालक धर्मेंद्र मंडलोई यांच्या सांगण्यावरून आडगावमधील ओम ट्रान्सपोर्टचे चालक विजय कोठावले यांना 27 जुलै रोजी 845 विदेशी दारूचे बॉक्स नांदेडला पाठविले. मात्र, माल पोहचले नसल्यानं दोन दिवसांनंतर ट्रकचालक बागुल यास विचारणा केली. तर येथे ट्रक खराब झाल्याचे सांगण्यात आले. कोठावले यांनी या ट्रकबाबत मंडलोई यांना कळविले असता संशय आल्यानं मंडलोईनी ट्रकची तपासणी केली.
दरम्यान, 845 पैकी 376 बॉक्सचा अपहार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी प्रथम मंठा पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, तो आडगाव हद्दीत घडल्याने नाशिक पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. आडगाव पोलिसांनी या आठ संशयितांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.