ब्रेन डेड तरूणामुळे 13 जणांना मिळणार जीवनदान

ब्रेन डेड तरूणामुळे 13 जणांना मिळणार जीवनदान

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिकमधून ब्रेन डेड रुग्णाचे हृदय एअर ग्रीन कॉरिडोरनं पुण्याकडे रवाना झालं. पुण्यातील रुबी रुग्णालयात प्रत्यारोपण होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील हे पहिलंच एअर ग्रीन कॉरिडोर आहे.

 

नाशिकमध्ये अश्विन झळके या युवकाचा बाईकवरून घसरून अपघात झाला होता. या अपघातात झळके यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र 12 तासांनी डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आले.

 

दरम्यान, झळके यांच्या कुटुंबीयांना अवयव दानाची संकल्पना समजावून सांगण्यात आली. त्यानंतर नातेवाईकांनीही अवयव दान करण्यासाठी तयारी दर्शवली. हृदयापासून ते त्वचेपर्यंत झळके यांचे अवयव दान करण्यात आले असून 13 रुग्णांना जीवदान मिळणार आहे. झळके यांचे कुटुंब जेलरोड परिसरात वास्तव्यास आहे. झळके यांच्या पश्चात दोन लहान मुले, भाऊ, बहिणी असा परिवार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version