नाशिकमध्ये चिमुरड्याला मच्छर कॉईलने दिले 40 चटके

नाशिकमध्ये चिमुरड्याला मच्छर कॉईलने दिले 40 चटके

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

नाशिकच्या वाडीवऱ्हे येथील गोंदे गावात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. साडेतीन वर्षाच्या चिमुरड्याला त्याच्या सावत्र बापानेच अमानुष मारहाण केली आहे. शरीरावर 40 ठिकाणी चटके देऊन मारहाण केल्याची हृयद्रावक घटना घडली आहे.

संस्कार राऊत असे या मारहाण झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. मद्यधुंद अवस्थेत आलेल्या बापाने आपल्या मुलाला पाढा म्हणता येत नाही, याचा राग आल्याने त्याला मारहाण करायला सुरुवात केली. एवढेच नाही तर त्याला मच्छर कॉईलने शरीरावर 40 ठिकाणी चटके दिले आहेत. मध्यस्ती करण्यासाठी गेलेल्या आईला देखील हेमंत राऊत याने मारहाण केली.

या घटनेनंतर वाडीवऱ्हे पोलिसांनी सावत्र पिता हेमंत राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलं आहे. या घटनेत जखमी झालेल्या चिमुरड्या संस्कार राऊतवर सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version