जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
दिवाळी उलटून आठवडा होत आला तरी घोषित केलेल्या कर्जमाफीची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. सरकारतर्फे केवळ घोषणांवर बोळवण करत कर्जमाफीची प्रमाणपत्र दिली जाता आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून दिवळीच्या शुभेच्छा मिळाल्या परंतु प्रत्यक्ष खात्यात पैसे कधी मिळणार? असा सवाल संतप्त शेतकरी करत आहेत. विशेष म्हणजे ज्या ठिकाणाहुन शेतकरी संपाला सुरुवात झाली होती त्या पुणतांबा आणि नजिकच्या गावातील शेतकरी सरकारच्या निव्वळ घोषणाबाजीमुळे हवालदिल झालाय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.