जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते पुन्हा एकदा एकवटलेत.
22 महिन्यांनापासून छगन भुजबळ हे मनी लॅन्डरिंग प्रकारामध्ये तुरुंगात आहे छगन भुजबळ यांच्या सुटकेसाठी या आधीही गेल्या वर्षी समर्थकांकडून भव्य मोर्चा काढण्यात आला होता, तर महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालायत काळे कपडे घालून निषेध नोंदवण्यात आला होता, भुजबळांवरील कारवाई सुडबुद्धीने होत असून त्याना जामीन मंजूर होऊन लवकर तुरुंगातून सुटका व्हावी या मागणीसाठी कार्यकर्ते एकत्र आलेत.
भाजप शिवसेना नेते देखील पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहेत. विधिमंडळ अधिवेशन काळात मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा काढण्याचा निर्णय देखील घेण्यात आलाय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.