उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या कार्यक्रमात वीज चोरी

उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या कार्यक्रमात वीज चोरी

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या कार्यक्रमात वीज चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

 

उर्जामंत्र्यांचा नाशिकमध्ये कार्यक्रम होता. यासाठी रस्त्यावर असलेल्या विजेच्या खांबावरुन वीज कनेक्शन घेण्यात आले.

 

वीज प्रश्नी नागरिकांबरोबर थेट सवांद साधण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  

 

मात्र, या कार्यक्रमासाठी चक्क वीज चोरी करण्यात आली. कॅमेरा पाहताचं महावितरण अधिकाऱ्यांची धावपळ झाली. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version