स्ट्रेचर नसल्याने बाळाला ऑक्सीजनचा सिलेंडर आणि सलाईनसहित कडेवरुन नेले दुसऱ्या विभागात

स्ट्रेचर नसल्याने बाळाला ऑक्सीजनचा सिलेंडर आणि सलाईनसहित कडेवरुन नेले दुसऱ्या विभागात

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिक जिल्हा रुग्णालयातील बाल विभागाचं वास्तव जय महाराष्ट्रनं उघडकीस आणल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. यामुळे राज्यातील शासकीय रुग्णालयांचा प्रश्न ऐरणीवर आला.

 

त्यानंतर नागपूरच्या शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार जय महाराष्ट्रनं समोर आणला. नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात स्ट्रेचर अभावी एका बाळाला ऑक्सीजनच्या सिलेंडर आणि सलाईन सकट दुसऱ्या वॉर्डमध्ये घेऊन जातानाचं दृष्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

 

हा धक्कादायक प्रकार समोर येताच हॉस्पीटल प्रशासनाला याबद्दल जाब विचारण्यात आला. मात्र, हॉस्पीटलकडून कोणीही यावर बोलायला तयार न्हवते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version