जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
मोठा गाजावाजा करत नाशिकहून सुरु करण्यात आलेली एअर डेक्कनची विमानसेवा अवघ्या काही दिवसांतच बंद पडली.15 मार्चपासून ही सेवा बंद असून, पायलट प्रशिक्षणासाठी गेल्याचं एअर डेक्कनच्या वतीनं सांगण्यात येतंय.
मुहुर्तापासूनच ग्रहण लागलेल्या या नाशिकच्या विमानसेवेचा टेकऑफ पुन्हा रखडल्याचं बघायला मिळतंय. केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना विमानसेवेचा आनंद घेता यावा यासाठी या विमानसेवेला सुरुवात करण्यात आली होती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.