भाजपमध्ये येण्यासाठी मला एक कोटी रुपयांची ऑफर दिली; हार्दिक पटेलची साथ सोडून भाजपमध्ये आलेल्या नेत्याचा आरोप

भाजपमध्ये येण्यासाठी मला एक कोटी रुपयांची ऑफर दिली; हार्दिक पटेलची साथ सोडून भाजपमध्ये आलेल्या नेत्याचा आरोप

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचा धुरळा उडतोय. अशातच भाजपला सणसणीत चपराक ठरणारी घटना घडलीये.

पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलची साथ सोडून भाजपमध्ये सामील झालेल्या नरेंद्र पटेल यांनी भाजपला पहिल्याच दिवशी घरचा आहेर दिलाय.

नरेंद्र पटेल हे पाटीदार समाजाचे नेते असून, हार्दिक पटेलचे निकटवर्तीय आहेत.

“भाजपमध्ये सामील करुन घेण्यासाठी मला एक कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली. यातील 10 लाख रुपयांची रक्कम पक्षप्रवेशासाठी सुरुवातीलाच देण्यात आली. उर्वरित 90 लाख रुपये नंतर देण्यात येणार होते.” असा घणाघाती आरोप नरेंद्र पटेल यांनी केलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version