खनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन

खनिज तेलाचे दर कमी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच सौदी अरेबियाला आवाहन

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका अजूनही कायम आहे, पेट्रोल 11 पैशांनी तर डिझेल 24 पैशांनी महागलं आहे.

दरम्यान वाढत्या इंधन किंमती या जागतिक विकासाला बाधक ठरत असल्याचे सांगत सौदी अरेबियासारख्या तेल उत्पादक देशांनी खनिज तेलाच्या किंमती परवडणाऱ्या पातळीवर आणाव्यात असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. 

भारत तसेच विदेशातील तेल आणि वायू क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रमुखांशी चर्चा करताना पंतप्रधानांनी हे आवाहन केलं आहे.

या बैठकीला सौदी अरेबियाचे तेल मंत्री खालिद अल फलिह तसेच संयुक्त अरब अमिरातीतील मंत्रीही उपस्थित होते.

भारत हा जगातील चौथा मोठा इंधन आयातदार देश आहे, सौदी अरेबियाप्रमाणेच काही आखाती देशांमधून भारत देश इंधन आयात करतो.

देशाला लागणाऱ्या एकूण इंधनापैकी 83 टक्के गरज ही आयातीमधून भागवली जाते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version